भौतिक शास्त्र प्रयोग शाळेचे डी. एस. हायस्कूल माजी पर्यवेक्षिका कै. सौ. आशा करमरकर नामें समर्पण. त्या निमित्ताने आठवणी तील करमरकर बाई
उषा दुपारे दि. 05-09-2020 डी. एस. हायस्कूल मध्ये अनेक शिक्षक -शिक्षिका आहेत त्यांच्या कडून काही ना काही शिकावे. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या पैकी करमरकर बाई या एक शिक्षिका. कर्तव्य दक्ष, गणित या विषयाबाबत सखोल अभ्यास असणाऱ्या, इतरांबद्दल आस्था असणाऱ्या. 2जुलै 1982हा माझा शाळेतील पहिला दिवस. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रात्रे बाई यांनी सांगितल्यानुसार दुपार अधिवेशनातील पर्यवेक्षिका सौ. करमरकर बाईंच्या केबिनमध्ये जाताना मी काहीशी भांबावलेली होती. पण त्यांचा हसत मुख चेहरा व व्यक्ती मत्त्व पाहून माझ्यावरील दडपण दूर झाले. ...