भौतिक शास्त्र प्रयोग शाळेचे डी. एस. हायस्कूल माजी पर्यवेक्षिका कै. सौ. आशा करमरकर नामें समर्पण. त्या निमित्ताने आठवणी तील करमरकर बाई
उषा दुपारे
दि. 05-09-2020
डी. एस. हायस्कूल मध्ये अनेक शिक्षक -शिक्षिका आहेत त्यांच्या कडून काही ना काही शिकावे. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या पैकी करमरकर बाई या एक शिक्षिका. कर्तव्य दक्ष, गणित या विषयाबाबत सखोल अभ्यास असणाऱ्या, इतरांबद्दल आस्था असणाऱ्या. 2जुलै 1982हा माझा शाळेतील पहिला दिवस. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रात्रे बाई यांनी सांगितल्यानुसार दुपार अधिवेशनातील पर्यवेक्षिका सौ. करमरकर बाईंच्या केबिनमध्ये जाताना मी काहीशी भांबावलेली होती. पण त्यांचा हसत मुख चेहरा व व्यक्ती मत्त्व पाहून माझ्यावरील दडपण दूर झाले. त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. शिकवायला असणाऱ्या वर्गाचे वेळा पत्रक दिले. माझी शाळा नियमित पणे सुरु झाली.
घटक चाचणी असो, सहामाही किंवा वार्षिक परीक्षा असो, पेपर कसा काढावा, ते पेपर तपासण्या बाबत मीटिंग घेऊन त्याबद्दल सर्व सूचना देत असत. जेष्ठ -कनिष्ठ हा भेदभाव त्यांच्या कडे नव्हता. चांगल्या कामाचे त्या कौतुक ही करीत. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या अभ्यासाबाबत अतिशय दक्ष होत्या. पालकच मुलांचा अभ्यास घेतात हे जाणून तो कसा घ्यावा, यासाठी त्यांनी मुलांच्या पालकांचे शनिवारी वर्ग घेतले. नोकरीत शिक्षक म्हणून नियुक्त झाल्या नंतर मुलांना शिकवणे अपरिहार्य च असते, ते टाळून चालत नाही पण मुलांच्या प्रगती साठी पालकांचे वर्ग घेणे यातूनच त्यांचा मोठेपणा अधोरेखित होतो.
वार्षिक परीक्षेच्या कामकाजातही त्या जातीने लक्ष द्यायच्या. पेपर तपासल्यानंतर त्या पेपर चे चेकिंग करण्यासाठी ही शिक्षकांना मदत करायच्या. त्या बाबत त्यांचा वेग एवढा प्रचंड होता की जणू काही करमरकर बाई म्हणजे गणक यंत्रच. एप्रिल 1984 मध्ये दुःखद प्रसंग माझ्यावर ओढवला होता. त्यावेळेस त्यांनी बहुमोल मदत केली. हिशोबाच्या बाबत ही करमरकर बाई काटेकोर होत्या. 25 पैसे का असेना ज्याचे त्याला परत मिळालेच पाहिजे असे त्यांना वाटे. व त्या प्रमाणे त्या करीतही असत.
5 सप्टेंबर ला च एक दोन वेळा त्या शाळेत आल्या होत्या. त्या वेळेस सर्वच शिक्षकांची आस्थेने चौकशी केली. करमरकर बाई कामाच्या बाबत ही काटेकोर होत्या. ज्या कामासाठी वेळ काढला आहे त्या वेळेस ते काम झालेच पाहिजे असा त्यांचा खाक्या होता. माझा आणि करमरकर बाईंचा संबंध तीन वर्षाचा. कारण काही अडचणीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. पण या काळातही त्यांची एक छाप माझ्यावर पडली ती अजूनही कायम आहे. एक शिक्षिका म्हणून, एक पर्यवेक्षिका म्हणून, व त्यातील व्यवस्थापन या भूमिका उत्तम तऱ्हेने निभावल्या. शाळेचे व विद्यार्थ्यांचे हित त्यांनी नेहमीच पाहिले. अशा कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, आदर्श पर्यवेक्षिका (सौ. आशाताई करमरकर )यांचे नाव भौतिक शास्त्राच्या प्रयोग शाळेला देणे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान केला असेच म्हणावे लागेल.
अशा आदर्श पर्यवेक्षिकेला माझे विनम्र अभिवादन. !!!!!
श्रीमती उषा खेमचंद दुपारे,
9819738726